नागपूर दि.२३ ऑगस्ट – जनलोकपाल विधेयकासाठी उपोषणास बसलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजार यांच्या आंदोलनास नागरपूरमध्य मोठ्याप्रमाणावर पाठिबा मिळत आहे.त्यांना १६ ऑगस्ट रोजी अटक केल्यापासून आतापर्यंत नागपूरमधील जनतेसहित व्यापारी संस्थां आणि इतर संघटनांनी अनेक प्रकारे अण्णा हजारेना पाठिबा दर्शवला आह.
१६ ऑगस्ट रोजी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर भाजपाच्यावतीने मावळ येथे झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली निषेध सभेचे आयोजन केले होते. सभा सुरू होण्यापूर्वीच अण्णांच्या अटकेची बातमी हाती आली. त्यानंतर सभेत मावळबरोबर अण्णांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. सभेत भाजप कार्यकर्त्यांबरोबर अण्णांच्या लोकपाल विधेयक संघर्ष समितीचे कार्यकर्तेही पांढर्या टोप्या घालून आणि हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. या सभेत मुनगंटीवारांसोबत बनवारीलाल पुरोहित, देवेंद्र फडणवीस, दयाशंकर तिवारी, प्रा. अनिल सोले प्रभृतींचीही सरकारचा निषेध करणारी भाषणे झाली. आ. देवेंद्र फडणविसायांनी अटकेच्या निषेधात भाजपतफर्े जेलभरो आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती.त्याला अनुसरनू दुसर्या दिवशी गांधी पुतळ्यासमोर झालेल्या जेलभरो आंदोलनात हजारो कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली.
भाजपने सुरू केलेल्या या आंदोलनात काही काळानंतर अनेक संघटनांनी सहभाग घेतला. अण्णा हजारेंच्या जनलोकपाल विधेयक संघर्ष समितीचे डॉ. गोपाळ बेले यांच्या नेतृत्वात रिझर्व बँक चौकातील डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आणि उपोषण आंदोलन सुरू झाली. आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आ लेल्या मेणबत्ती मार्चमध्ये मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी आपला सहभाग दर्शवला .सरकार जनलोकपाल विधेयकास मजूंरी देत नाही तोपर्यंत दररोज हा मेणबत्ती मार्च सुरूच राहणार आहे. या आंदोलनाला जनमंच या नागरिक संघटनेसह अनेक संघटनांनी स्वयंस्फुर्त पाठिबा दिला असून दररोज या आंदोलनात उतरणार्या संघटनांची संख्या वाढतेच आहे. विद्यार्थी संघटनांनीही महाविद्यालय बंद ठेवून या आंदोलनात सहभाग दिला. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी रॅली काढली आणि रास्ता रोको आंदोलनही केले.
रामलीला मैदानावर उपोषण करूनही सरकार झुकत नसल्यामुळे अखेर अण्णा हजारेंनी आपल्या समर्थकांना याचा जाब विचारण्यासाठी खासदार,आमदार आणि अन्य नेत्यांच्या घरासमोवर निदर्शने करण्याचे आवाहन केले. त्यानूसार रविवार आणि सोमवारी काँग्रेसचे राष्ट*ीय सरचिटणीस खा. विलास मुत्तेमवार आणि चिटणीस खा. अविनाश पांडे यांची नागपुरातील घरे, खा. दत्ता मेघे यांचे वर्ध्यायेथील घर तर खा. विजय दर्डा यांचे यवतमाळमधील घर येथे आंदोलकांनी जाऊन जोरदार निदर्शने केली. अण्णांच्या या आंदोलनाला व्यापार्यांचाही जोरदार पाठिबा मिळाला. सोमवारी नागपूर विदर्भ चेंबर्स ऑफ कॉमर्स ने विदर्भ बंदचे आवाहन केले होते. त्याला व्यापार्याकडून उत्सर्फुत प्रतिसाद मिळाला. एकट्या नागपूर शहरातील सर्व व्यापार बंद राहिल्यामुळे ५०० कोटी च्या वर उलाढाल ठप्प झाली. हाच प्रकार इतर सर्वच जिल्ह्यात थोड्याॅफार फरकाने होता. नागपुरात व्यापार्यांनी भव्य रॅली काढली. आणि भ्रष्टाचाराला जोरदार विरोध दर्शविला.
विदर्भावरील अन्याय आणि वेगळ्या विदर्भाची मागणी या संदर्भात गेल्या काही दिवसात झालेल्या आंदोलनांना पुरेसा प्रतिसाद नसल्यामुळे विदर्भाची मागणीच नाही असा निष्कर्ष काढला जातो. विदर्भाचे समर्थक मात्र या निष्कर्षाला विरोध करीत राजकीय नेतृत्वाच्या धरसोडीमुळे जनसामान्य सध्या या मुद्यावर राजकारण्यासोबत जात नाहीत असा दावा करतात. विदभाच्या मागणीसाठीही जर गैरराजकीय आणि प्रामाणिक नेतृत्व पुढे आले तर आजही जनसामान्य या मागणीला पाठिबा देतील असा दावा या मागणीचे समर्थक आज अण्णांच्या आंदोलनाला मिळालेल्या समर्थनाच्या पार्श्वभूमीवर करीत आहेत.