चीनी अॅप्सवर बंदीचे ‘नो टेन्शन’, हे आहेत पर्यायी अॅप्स


केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत देशाचे सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचे हित लक्षात घेत 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय काल संध्याकाळी घेतला आहे. यामध्ये TikTok, कॅमस्कॅनर, UC Browser, शेअरइट, क्लीन मास्टर यांसारख्या अनेक लोकप्रिय अॅप्सचा समावेश आहे. त्यामुळे आता आपल्यापैकी अनेकजण सध्या सोशल मीडियावर या अॅप्स बद्दल चर्चा करत आहेत. त्याचबरोबर या अॅप्सना कोणते पर्यायी अ‍ॅप्स उपलब्ध आहेत का याची देखील जोरदार चर्चा होत आहे. त्यातच आज आम्ही आमच्या वाचकांसाठी TikTok,CamScanner,UC Browser, Shareit, Shein, Mi Community, Club Factory, Xender, Mi Video Call आणि WeChat यांना पर्याय असलेल्या अॅप्सची माहिती घेऊन आलो आहोत, चला तर मग जाणून घेऊ या कोणती आहेत ती अॅप्स…

सरकारने बंदी घातलेल्या अॅप्समध्ये शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टीक-टॉकचा पहिला नंबर आहे. टीक-टॉकसाठी प्ले स्टोअरवर काही भारतीय अॅप्सचे पर्याय उपलब्ध आहेत. TikTokला पर्याय म्हणून Mitron आणि Chingari हे दोन अॅपचा वापर आपण करु शकता. त्याचबरोबर यातील बहुतांश फीचर्स टीक-टॉकप्रमाणेच आहेत. हे दोन्ही अॅप्स गेल्या काही दिवसांमध्ये चांगलेच लोकप्रियही झाले आहेत.

त्याचबरोबर सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या UC Browser या ब्राउझरवरही सरकारने बंदी घातली आहे. UC Browser साठीही प्ले स्टोअरवर दोन चांगले पर्याय आहेत. UC Browserला पर्याय : गुगल क्रोम आणि Mozilla Firefox हे दोन्ही ब्राउझर UC Browser पेक्षा अधिक सुरक्षित, विश्वासार्ह आणि लोकप्रियही आहेत.

आपल्यापैकी अनेकजणफाइल ट्रांसफर करण्यासाठी शेअरइटचा सर्रास वापर करतात पण त्यावर देखील आता बंदी घालण्यात आली आहे. शेअरइटला पर्याय म्हणूनही काही उत्तम पर्याय आहेत. Shareit ला पर्याय म्हणून स्मार्टफोनधारक Files Go चा Shareit ला पर्याय म्हणून वापर करु शकतात. या अॅपद्वारे फाइल मॅनेज आणि फोन स्टोरेज क्लीन-अप देखील करु शकतात. तर, iOS युजर्ससाठी बिल्ट इन एअरड्रॉप फंक्शन हा Shareit ला पर्याय आहे.

त्याचबरोबर बातम्यांसाठी लोकप्रिय असलेल्या UCNews साठीही दोन चांगले पर्याय आहेत. UCNews ला पर्याय म्हणून Inshorts आणि DailyHunt, Newspoint, Jio News हे अॅप्स वापरता येऊ शकतात.

अनेकजण ES File Explorer फाइल मॅनेज करण्यासाठी या अॅपचा वापर करतात. या अॅपसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध आहे. ES File Explorer ला पर्याय म्हणून file commander – file manager & free cloud या अॅपचा वापर करु शकतात.

Kwai, Helo, Likee, Bigo Live या सर्व व्हिडिओ शेअरिंग अॅप्ससाठी तुम्ही Roposo या भारतीय अॅपचा वापर करु शकतात.

Baidu Maps ला सर्वोत्तम पर्याय म्हणजे Google Maps आहे. याशिवाय MapMyIndia याचाही वापर करता येईल.

त्याचबरोबर बंदी घातलेल्या अॅप्समध्ये Club Factory आणि Shein या डिझाइनर कपड्यांच्या शॉपिंगशी संबधित अॅप्सचाही समावेश आहे. Club Factory and Shein ला पर्याय म्हणून Myntra आणि Flipkart या दोन अॅप्सचा वापर तुम्ही पर्याय म्हणून करु शकता.

तसेच Mi Video Call आणि WeChat अॅपसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पण आम्ही WhatsApp चा याला सर्वोत्तम पर्यायासाठी सल्ला देऊ.

भारतात CamScanner अॅप बरच लोकप्रिय असून याचा वापर अनेक ठिकाणी केला जातो. कॅमस्कॅनर जर तुम्हीही वापरत असाल तर चिंता करण्याचे कारण नाही, कारण कॅमस्कॅनरसाठीही काही चांगले पर्याय उपलब्ध आहेत. CamScanner ला पर्याय म्हणून Adobe Scan आणि Microsoft Office Lens हे दोन अॅप्सचा वापर करुन शकता.

Leave a Comment