.jpg)
नवी दिल्ली दि.२१ ऑगस्ट – लोकपाल विधेयकावर चर्चेसाठी रामलीला मैदानच योग्य व्यासपीठ असल्याचे ठाम मत अरविद केजरीवाल यांनी व्यक्त केले आहे.या अगोदर शनिवारी पंतप्रधान मनमोहन सिग यांनी लोकपाल विधेयकासाठी चर्चेची तयारी दर्शवली होती.पंतप्रधानांचा प्रस्ताव मान्य असून चर्चेसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.रामलीला मैदानावर यावर खुली चर्चा घेऊन निर्णय घेण्यात येईल.त्यामुळे लोकांना त्याच्या हिताचे मुद्दे कळण्यास मदत होईल ,असे म्हणत त्यांनी आपलाच मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे.
जनलोपाल विधेयकाच्या मसुद्यातील एखाद्या विधेयकाबाबत मतभेद असतील ते वगळण्यात येतील.सरकारी लोकपाल ,जनलोकपाल सोबत तिसर्या लोकपाल विधेयकाच्या मसुद्यावरही चर्चा करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.सामाजिक कार्यकर्ता अरूणा रॉय यांनी नुकतेच लोकपाल विधेयकाचा तिसरा मसुदा स्थायी समितीसमोर सादर करणार असल्याची माहिती दिली होती.त्या उद्देशुन केजरीवाल यांनी अप्रत्यक्षपणे म्हटले आहे.याबरोबर त्यांनी काँग्रेससह देशातील सर्व राजकीय पक्षांना लोकपालबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहे.
