
नवी दिल्ली दि.२० ऑगस्ट- सक्षम लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसलेल्या अण्णा हजारे यांनी शनिवारी सरकारवर दबाव आणण्यासाठी देशातील तमाम नागरिकांनी एक अनोखे आवाहन केले. आपल्या मतदारसंघातील खासदारांच्या घरासमोर उपोषण करण्याचे आवाहन हजारे यांनी देशवासियांना केले आहे.
शेतकर्यांच्या जमिनी घेताना यापुढे ग्रामसभेची मान्यता घेतल्याशिवाय कोणालाही ती जमीन हस्तगत करता येणार नाही, हा कायदाही सरकारने लवकर मंजूर करावा, असे आवाहन अण्णांनी सरकारला केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी टीम अण्णा व सरकारमधील दरी वाढत चाचली असल्याचे दिसून आले. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पी. नारायणस्वामी यांनी टीम अण्णांना आपल्या मर्यादीत राहण्याचा सल्ला दिला असून यावर टीम अण्णाने नारायणस्वामी यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे
