या कंपनीने तयार केला ‘स्मार्ट मास्क’, 8 भाषेत करणार भाषांतर

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. स्मार्ट बँड, अ‍ॅप्सचा वापर केला जात आहे. बाहेर जाताना मास्क लावणे देखील अनिवार्य आहे. मास्कचा वापर आता नियमित झाला असल्याने, बाजारात मास्कची मागणी देखील वाढली आहे. आता जपानच्या एका स्टार्टअपने तंत्रज्ञानाचा वापर करत थेट स्मार्ट मास्क तयार केले आहे. हा मास्क इंटरनेटशी कनेक्ट होतो. हा मास्क फोनवर आलेले मेसेज देखील तुम्हाला वाचून दाखवेल. याशिवाय मास्क जपानी भाषेचे 8 विविध भाषेत भाषांतर करण्यास सक्षम आहे.

Image Credited – WHTC

डोनट रोबोटिक्स नावाच्या कंपनीने या मास्कची निर्मिती केली असून, या खास मास्कला कंपनीने ‘सी-मास्क’ नाव दिले आहे. हा मास्क स्मार्टफोनच्या ब्लूटूथशी कनेक्ट राहील व मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑपरेट होईल. मास्क कमांड दिल्यावर तुमच्यासाठी फोन कॉल देखील करेल.

Image Credited – NDTV

कंपनीचे सीईओ तैसुक ओनो म्हणाले की, आम्ही रोबॉटला तयार करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली. आता आम्ही त्याच टेक्नोलॉजीचा उपयोग संसर्गाशी लढणाऱ्या उत्पादनांमध्ये करत आहोत. सी मास्कचे 5000 युनिट्स सप्टेंबरपर्यंत बाजारात येतील. कंपनीच्या सीईओना या मास्कचा पुरवठा चीन, अमेरिका आणि यूरोपमध्ये करायचा आहे. एका मास्कची किंमत 40 डॉलर (जवळपास 3000 रुपये) आहे. या मास्कला ऑपरेट करण्यासाठी एक अ‍ॅप देखील लाँच केला जाईल.

Leave a Comment