
14 जूनला मुंबईतील वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येची ही घटना मनाला चटका लावणारी होती. सध्या मुंबई पोलीस सुशांतच्या आत्महत्येच्या मागील कारणांचा तपास करीत आहे. दरम्यान पोलिसांनी सुशांतच्या कुटुंबियांचा, कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीसह जवळच्या मित्र-मैत्रिणींचा जबाब नोंदवला आहे.
बिहारमध्ये सलमान, करण आणि आलिया भट्टच्या चित्रपटांवर बंदी ?
बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा सुशांतच्या निधनानंतर चर्चेत आला आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार करण जोहर, आलिया भट आणि सलमान खान यांच्या चित्रपटांवर राज्यात बंदी घालण्याची मागणी बिहारच्या पाटण्यामधील लोक करत आहेत. सलमान खान आणि करण जोहरला सुशांतच्या आत्महत्येला जबाबदार ठरवले जात आहे. त्याचबरोबर या दोघांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून भरमसाठ टीका होत आहे, तसेच त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे.
दरम्यान आता बॉलिवुडमधील या माफियांविरोधात आता आवाज उठू लागला. याचकाळात अभिनेत्री कंगना राणावतसह मोठमोठ्या दिग्दर्शकांनी सुशांतचा मृत्यू नाही हत्या असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये सलमान खान, करण जोहर, एकता कपूर, संजय लीला भन्साळी यांची नावे समोर येऊ लागली. बिहारमध्ये एका वकीलाने तर त्यांच्याविरोधात खटलाच दाखल केला आहे.
