सोनियांचे मोदींना पत्र; देशातील नागरिकांना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य द्या


नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी मोदी सरकारकडे सप्टेंबर 2020पर्यंत सरकारने राष्ट्रीय अन्न-सुरक्षा कायद्यांतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा करावा. त्याचबरोबर जे गरीब लोक अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत येत नाहीत, अशांनाही सप्टेंबरपर्यंत सरकारने धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने मोफत धान्य जून महिन्यापर्यंत देण्याची घोषणा केली होती. पण, आणखी तीन महिन्यांसाठी ही मोफत धान्य योजना वाढवावी, असे सोनिया गांधींनी पंतप्रधानांन लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.


सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रात एप्रिल ते जून या काळात राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्रती व्यक्ती 5 किलो अतिरिक्त मोफत धान्य देण्याचा निर्णय प्रशंसनीय आहे. पण, लॉकडाऊन आणि त्याचा होणारा परिणाम, या पार्श्वभूमीवर सरकारला आम्ही काही सुचवू इच्छितो.

सर्वसामान्य नागरिक आणि स्थलांतरीत मजुरांना लॉकडाउनचा मोठा फटका बसला आहे. तर, या मोफत धान्य योजनेचा लाभ अद्याप कित्येक गरिबांना मिळालेला नसल्यामुळे मोफत धान्य पुरवठा योजना आणखी तीन महिने वाढवून, गरिबांना सप्टेंबर महिन्यापर्यंत मोफत धान्य दिले जावे, अशी मागणी सोनिया गांधींनी केली आहे.

Leave a Comment