…असा भारतीय संघ गेल्या दहा वर्षात बघितला नव्हता- गांगुली

बर्मिंगहॅम-सुमार गोलंदाजी,ढिसाळ क्षेत्ररक्षण त्यात फलंदाजांची हाराकिरी वृत्ती यामुळे पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते.त्याचीच पूनरावृत्ती तिसर्‍या कसोटीत पाहायला मिळत असून तेथेही मानहानिकारक पराभव जवळपास निश्चित झाला आहे.यामुळे भारतीय संघ एका निराशेच्या गर्तेत गेला असून गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा भारतीय संघाची अशी दयनीय अवस्था झाली असल्याची खंत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केली आहे.

बर्मिंगहॅमच्या कसोटीत एजबॅस्टनच्या उसळत्या खेळपट्टीवर भारतीय संघाचा पहिल्या डावात २२४ धावांवर खुर्दा उडला होता.चार कसोटी मालिकेच्या पर्तोडी ट्रोफी भारतीय संघ पहिल्याच सामन्यापासून दडपणात आला होता.त्यात खेळांडू जायबंदी होण्याची जणू मालिकाच सुरू झाली होती.यामुळे खेळांडू मानसिक दृष्टया थकले होते.आणि याचा प्रत्यय खेळामध्ये दिसून येत होता.पहिल्या दोन सामान्यांमधील चुकामधून भारतीय संघाने कोणताच धडा घेतला नसल्याचे तिसर्‍या कसोटीत दिसून आले असल्याचे त्यांने एका मुलाखती दरम्यान सांगितले.संघावर होत असलेल्या टिकेची दखल घेतली पाहिजे.संघाने गेल्या काही सामन्यात सुमार दर्जाचा खेळ केला आहे.तिसर्‍या दिवशी तर खेळांडूनी कहरच केला.क्षेत्ररक्षणाच्या वेळी खेळाडू सोपे झेल सोडण्यात आले , तेज त्रिकूटाची गोलंदाजी भरकटली होती.यामुळे इंग्लंडच्या फलंदाजांनी मुक्तपणे फटकेबाजी करत सातशे धावांचा डोंगर उभारला.दुसर्‍या डावात भारतीय संघाचा फटकेबाज खेळाडू सेहवाग धावांचे खाते न उघडता माघारी परतला.यावरून खेळाडूची मानसिकत दिसत असल्याचे त्यांनी निर्दशनास आणून दिले. मालिकेत २-० ने मागे पडलेल्या भारतीय संघावर मालिका गमावण्याची पाळी आली आहे.तसेच त्यांचे अव्वल क्रमांकाचे ताज ही धोक्यात आल्याचे त्याने म्हटले .ट्वेंटी २० सामन्यात खोर्‍यांने मिळणारा पैसा यामुळे खेळांडूचा कसोटी सामन्यातील उत्साह कमी झाला आहे.तसेच व्यस्त खेळामुळे निर्माण होणारा अतिताणसही त्याने जबाबदार धरले आहे.