पुणे, दि. १०- नुकतेच शैक्षणीक वर्ष सूरू झाले आहे, महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया पुर्ण झाली आणि आता ’महाविद्यालयांचा परिसर तरुणाईने ’फुलुन गेला आहे. कोणाला गुणवत्तेवर तर कोणाला व्यवस्थापन कोटा किवा राखीव जागाच्या माध्यमातून प्रवेश मिळाला आहे.महाविद्यालयांचे कामकाज सूरळीत सूरू असताना आज दुपारी अचानक सिबायोसीस अंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा लवळे कॅम्पसला ‘आरक्षणा’चा ’वर चढला होता.
कार्यक्रमाची वेळ झाली मात्र कार्यक्रम सूरू होत नाही म्हणुन संपुर्ण सभागृह एकमेकांशी गप्पा मारण्यात व्यग्र आहे आणि अचानक टळ्यांचा कडकडाट होतो व्यासपीठावर लक्ष जाते आणि समोर पाहिले तर मंचावर साक्षात महानायक अमिताभ बच्चन. सातत्याने संवेदनशिल विषय हाताळणार्या प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांचा ‘आरक्षण’हा चित्रपट उद्या (१२ ऑगस्ट) प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी दिग्दर्शक प्रकाश झा, अभिनेता प्रतिक बब्बर आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण यांनी आज सिबायोसीसच्या विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमिताभ बच्चन म्हणाले, आरक्षण ही घटनात्मक तरतुद आहे. आरक्षण हा चित्रपट कोणाचेही समर्थन करत नाही तसेच कोणाचा विरोध करत नाही. आम्ही फक्त एकाच भारत देशात असलेल्या दोन राष्ट्र नांदत आहेत यामुळे दोघांना समान संधीमिळाल्या शिवाय देशाची प्रगती होणार नाही असे मला वाटते. आज स्पर्धेविषयी आपण बोलत असलो तरी दोन गटांना एका समान पातळीवर आणल्या शिवाय त्यांच्यामध्ये स्पर्धा लावणे योग्य नाही यामुळे खालच्या वर्गाला संधी दिल्या शिवाय पर्याय नाही असे बच्चन यांनी सांगीतले. आम्ही कलाकार असल्याचे सांगत एखाद्या संवेदनशिल विषयावर कलाकृती निर्माण केल्याबद्दल आपल्याच देशात पोलिस बंदोबस्तामध्ये शीरावे लागते याची खंत बच्चन यांनी व्यक्त केली.
झा म्हणाले, आज सर्वांना डॉक्टर, इंजिनिअर किवा सेवा क्षेत्रात जायचे आहे. परंतु सर्वांची परिस्थीती सारकी नाही यामुळे काही सामाजिक बदल अपेक्षीत आहेत आणि या बदलांसाठी काही सामाजिक किमत चुकवावी लागली तर ती द्यावीच लागणार आहे. आरक्षण ही संकल्पना योग्य आहे मात्र त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत नाही असे मला वाटते.
नेत्यांनी सांगतलेले बदल स्वीकारावेच लागतात – झा
सेन्सॉरने संमती दिल्यानंतरही काही समाजिक संघटंनाचा चित्रपटाला आक्षेप आहे मात्र आम्ही काही नेत्यांना चित्रपट दाखवला आहे आणि त्यांच्या सुचने प्रमाणे काही दृष्यांना कात्री लावणार आहे असे झा यांनी सांगीतले. आम्ही कलाकृती निर्माण करतो मात्र लोकांच्या विरोधामुळे त्यात काही बदल करावे लागतात कारण यामध्ये आम्ही केलेली गुंतवणुक आणि कलाकारांच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन बदल करण्या शिवाय गत्यंतर नाही असे झा यांनी सांगीतले. काल छनग भुजबळ व आठवले समर्थकांना चित्रपट दाखविला आहे आणि आठवलेंना पहायचा असल्यास त्यांना चित्रपत दाखविण्याची तयारी आहे असे झा यांनी सांगीतले.
सिबायोसीस मध्ये ‘आरक्षण’, बीग बी ने व्यक्त केली पोलिस बंदोबस्ताची खंत
