कोरोनाचा यंदाच्या हज यात्रेलाही बसला फटका; यात्रेकरूंना परत मिळणार पैसे


मुंबई – देशाभोवती कोरोनाने आवळलेले फार्स आणखीनच घट असून त्यातच दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकड्यांमध्ये वाढ होत असल्यामुळे यावर्षीच्या सर्वच सण, यात्रा, उत्सवांवर विरजण पडले आहे. यावर्षीच्या सणांवर कोरोनामुळे मर्यादा आल्या आहेत. दरम्यान, यंदाच्या हज यात्रेलाही कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनामुळे यंदाची हज यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती केंद्रीय हज समितीकडून देण्यात आली असून यात्रेकरूंना त्यांचे पैसे परत देण्यात येणार आहेत.

अद्याप हज यात्रेसंदर्भात कोणातीही सूचना सौदी प्रशासनाकडून मिळाली नसल्यामुळे यावर्षीची हज यात्रा रद्द करण्यात आली आहे.तसेच केंद्रीय हज समितीकडून यात्रेकरूंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना परत दिली जाणार असल्याचे घोषित करण्यात आल्याची माहिती भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान यांनी दिली.

सौदी प्रशासनाने १३ मार्च २०२० पासून कोरोना संसर्गाचा वाढत असताना हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविली होती. ही यात्रा यंदा जुलै-ऑगस्टमध्ये होती. फार आधीपासूनच दरवर्षी हजची तयारी करावी लागते. त्यानंतर पुढील सूचना येणे अपेक्षित होते. पण, यात्रेसंबंधी कोणताही सूचना अद्याप आली नसल्यामुळे आता यात्रा रद्द झाल्याचे आपल्या देशातील केंद्रीय हज समितीने घोषित केले आहे.

केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर असलेला यात्रा रद्द करण्याचा फॉर्म यापूर्वी निवड झालेल्या उमेदवारांनी भरून तो [email protected] या इ-मेलवर पाठवावा. तसेच सोबत बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी. त्यानुसार त्यांना पैसे परत करण्यात येणार आहेत.

Leave a Comment