अमेरिका: प्रभू दयाल यांच्यावरील आरोप बिनबूडाचे

न्यूयॉर्क – अमेरिकेतील भारतीय महावाणिज्यदूत प्रभू दयाल यांच्यावर त्याच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे शनिवारी त्यांच्या वकीलाने सांगितले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने देखील दयाल यांचेच समर्थन केले आहे.दयाल यांच्या घरी काम करणार्या् मोलकरणीने तिचे पारपत्र जप्त करण्यासहीत अनेक आरोप केले होते. दिवसभर काम करुन घेणे, अडगळीच्या खोलीत झोपायला लावणे व आपला विनयभंग केल्याचाही आरोप केला होता.    
दयाल यांच्या घरी काम करीत असलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरे काम करु देण्यासाठी दयाल यांनी आपल्या मोलकरणीस परवानगी दिली नव्हती. त्यामुळेच तिने दयाल यांच्यावर असे आरोप केल्याचे एका वरिष्ठ राजनैतिक अधिकार्यालने सांगितले आहे. एका कामाव्यतिरिक्त दुसरे काम करणे हे पारपात्र अधिग्रहण नियमाविरुध्द असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दयाल यांच्या मोलकरणीने त्यांच्यावर केलेले बहुतेक आरोप बिनबुडाचे आहेत, असे दयाल यांचे वकील रुसेल रोसेन यांनी सांगितले.