दारिद्य्र निर्मूलनात भारत, चीन अव्वल

संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०१५ पर्यंतच्या साध्य करावयाच्या विकास उद्दीष्टांतर्गत दारिद्य्र निर्मूलन, माता बालक आरोग्य हे उद्दीष्ट साध्य करण्यात आशियायी विशेषतः भारत आणि चीन या अर्थव्यवस्थांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.भारताने दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रम राबविताना देशातील गरीबी ५१ टक्क्यांवरुन २२ टक्के पर्यंत आणली असून, त्याची प्रशंसा संयुक्त राष्ट्रसंघातर्फे शनिवारी प्रकाशित झालेल्या मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स २०११ या अहवालात करण्यात आली आहे. चीनमधील दारिद्य्र पीडितांचे प्रमाण २०१५ सालापर्यंत पाच टक्क्यांहूनही कमी असेल, असा अंदाज या अहवालात वर्तविला असून, भारतासाठी हे आव्हानात्मक ठरावे. दक्षिण आशियामध्ये पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व भूतान यांसारख्या देशांमध्ये दारिद्य्र निर्मूलन कार्यक्रमाची परिस्थिती फारच भयावह आहे.