सचिन-गावस्कर वेगळ्या दर्जाचे खेळाडू, कोहली करू शकत नाही बरोबरी – जावेद मियांदाद

पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियांदादने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बाबत मोठे वक्तव्य केले आहे. मियांदादनुसार, विराट कोहलीची तुलना सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यासोबत होऊ शकत नाही. दुसरे सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर सापडणे अवघड आहे. विराट त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज आहे. मात्र तो तेंडुलकर आणि गावस्कर यांच्या प्रमाणे बनू शकत नाही.

Image Credited – Aajtak

टेलिग्राफशी बोलताना मियांदाद म्हणाला की, मला वाटत नाही की माझ्या काळातील फलंदाजांची तुलना आताच्या क्रिकेटपटूंशी होऊ शकते. तुम्ही आणखी एक सचिन अथवा सुनील गावस्कर बनवू शकत नाही. आमच्या काळात वेगवान गोलंदाज आजच्या पेक्षा अधिक खतरनाक होते. मॅलकम मार्शल, रिचर्ड हेडली, डेनिस लिली, जेफ थॉमसन सारख्या गोलंदाजांसमोर खेळलो.

Image Credited – Aajtak

मियांदादनुसार, क्रिकेट आता बदलले आहे. विराट, स्टिव्ह स्मिथ आणि बाबर आजम यांची तुलना आधीच्या फलंदाजांसोबत करता येणार नाही. हे सर्व सर्वोत्तम आहेत, मात्र आधीच्या फलंदाजांची गोष्ट वेगळी होती. मियांदाद म्हणाला की, तुम्ही कोणत्याही दिग्गजाला आदर्श मानू शकता. मात्र क्लास आणि टॅलेंटला बदलू शकत नाही.

Leave a Comment