मुंबई दि.२८ – आवश्यक गोष्टींसाठी वाढत असलेला खर्च तसेच वाढती महागाई यामुळे उद्योग क्षेत्रातील निराशेचे वातावरण वाढत चालल्याचे एका अहवालात दिसून आले आहे.व्याजाचे वाढते दर,महागाई या चिंता उद्योग क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर सतावत आहेत.कंपन्यांची मुलभूत आर्थिक कामगिरी चांगली होत असली तरी वाढत्या खर्चाने सर्वजण हैराण झाले आहेत.
उद्योग क्षेत्रातील निराशेचे वातावरण वाढले
वेगाने विकास करीत असलेल्या उद्योग क्षेत्रांची संख्या ३० वरुन आता १० ते २० वर आली आहे. अलिकडे तर २० टक्के विकास म्हणजे सर्वोत्तम मानला जात आहे. १० ते २० टक्के विकासाला उच्च दर्जा दिला जात असून ० ते १० टक्क्याला चांगले म्हटले जात आहे. नकारात्मक कामगिरी करणार्याज उद्योग क्षेत्राची संख्या २५ वरुन ५ पर्यंत खाली आली आहे.
