मुंबई दि.२८ – फेब्रुवारी महिन्यात मबईतील मालमत्तांच्या विक्रीत काही प्रमाणात घट झाली असली तरी या शहरातील मालमत्तांना अजूनही चांगली मागणी असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीज अर्थात एमसीएचआयकडून सांगण्यात आले.फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील घरांची मागणी २.४० टक्क्याने घटली होती.सदर महिन्यात शहरात १६ हजार ७४३ च्या तुलनेत १६ हजार ३४१ मालमत्तांसाठी मागणी नोंदवण्यात आली.
मुंबईतील मालमत्तांना अजूनही जोरदार मागणी
मुंबईतील मालमत्तांच्या मागणीत वेगाने घट झालेली नाही, असे एमसीएचआयकडून सांगण्यात आले. चालू वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात मुंबईतील मालमत्तांची मागणी घटल्याचे एमसीएचआयचे अध्यक्ष सुनील मंत्री यांनी कबूल केले. मागणी काही प्रमाणात घटली असली तरी फ्लॅटची एकूण मागणी जोरदार आहे, असे मंत्री यांनी सांगितले. वर्ष २०१० मध्ये मुंबईत १ लाख ९४ हजार ८८५ च्या तुलनेत २ लाख १७ हजार ४६६ फ्लॅटसाठी मागणी नदवण्यात आल्याचे मंत्री यांनी स्पष्ट केले.
