‘‘आठवणींचे ढग रंगीबेरंगी” चे प्रकाशन

मुंबई दि.२६ मार्च – जेष्ठ रंगकर्मी व नाट्यनिर्माते स्वर्गीय मोहन वाघ यांच्या प्रथम स्मृतीप्रित्यर्थ ‘‘आठवणींचे ढग रंगीबेरंगी” या मोहन वाघ यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ रंगकर्मी विजया मेहता, जेष्ठ पत्रकार कुमार केतकर, शिरीष पै, अभिनेत्री सुलोचना दिदी, अभिनेत्री शशी कला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी स्व. मोहन वाघ यांच्या पत्नी श्रीमती पद्मश्री वाघ याही व्यासपीठावर उपस्थित होत्या.