वर्णभेदी विरोधी लढ्यात गुगल देणार कोट्यावधींचा मदत निधी

वर्णभेदी विरोधातील लढ्यात टेक कंपनी गुगलने 3.7 कोटी डॉलरच्या (जवळपास 279 कोटी रुपये) मदतीची घोषणा केली आहे. अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉयडच्या मृत्यूनंतर निदर्शन सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मदतीची घोषणा केली आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये सुंदर पिचाई यांनी मृत्यू झालेल्या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या सन्मानार्थ 8 मिनिटे 46 सेंकद मौन धरावे व एकता दर्शवावी.

Image Credited – India Today

मौन संदर्भात पिचाई म्हणाले की, हे सांकेतिक निदर्शन आहे. जॉर्ज फ्लॉयड यांना मृत्यूच्या आधी एवढा वेळ श्वास घेण्यास त्रास होत होता. हे फ्लॉयड आणि अन्य लोकांसोबत झालेल्या अन्यायाची आठवण करून देते. मदत निधीविषयी त्यांनी सांगितले की, 3.7 कोटी डॉलरमधील 1.2 कोटी डॉलर्स निधी वर्णभेदाविरोधात लढणाऱ्या संस्थांना दिला जाईल. तर 2.5 कोटी डॉलर जाहिरातींसाठी अनुदान म्हणून असेल.

Image credited – 9to5Google

पिचाईंनी सांगितले की, आमचे सुरुवातीचे योगदान 10-10 लाख डॉलर अशी सेंटर फॉर पोलिसिंग इक्विटी आणि इक्वल जस्टिस एनिशिटिव्ह यांना दिला जाईल. गुगल डॉट ओआरजी फेलोज प्रोग्रामच्या मदतीने तांत्रिक सहाय्य दिली जाईल.

Leave a Comment