अमरावती २४ मार्च – विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी पॅकेजमध्ये पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाने अर्धेअधिक लाभार्थी कागदावर दाखवून सहा जिल्ह्यांमध्ये ४० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे.कृषी विभागाच्या पॅकेज घोटाळ्यानंतर ही बाब पुढे आल्याने सरकारचे वाभाडे निघाले आहे.
अमरावती : कृषीनंतर पशुसंवर्धन खात्यातही घोटाळा
कृषी विभागाप्रमाणेच पशुसंवर्धन विभागातील दोषी अधिकार्यां वर कारवाई केली जाणार काय? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची घोषणा करण्यात आली, त्याची नावे काय? याची उत्सुकतादेखील ताणली गेली आहे. ही नावे बाहेर येण्यासा काही दिवस लागतील, असे येथील अधिकार्यां चे म्हणणे आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकर्यां ना दुग्ध व्यवसायासाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री पॅकेजमधून गेल्या तीन वर्षात एकूण १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची पॅकेज कार्यालयाकडून प्राप्त झालेली आकडेवारी सांगते, परंतू प्रत्यक्षात तेवढा खर्च शेतीच्या पूरक व्यवसायासाठी वापरण्यातच आला नाही. ही आकडेवारीदेखील शासकीय दप्तरी आहे, तर निधी गेला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे शेतीला पूरक व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना गायी, म्हशी, शेळ्या व मेंढ्या या दुधाळ जनावरांचे वाटप करण्यात आले, तसेच संकरित वासरांची जोपासना, कृत्रीम रेतन सुविधा, दूध शीतकरण केंद्राची स्थापना तसेच खाद्य वैरण पुरवठा कार्यक्रम या कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभागाने ४० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याचे आढळून आले आहे.
