नवी दिल्ली २१ मार्च – तृणमूल काँग्रेससोबत जागावाटपावरुन सुरु असलेला वाद संपण्याची कोणतीच चिन्हे दिसत नसल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने पश्चिम बंगाल विधानसभेच्या सर्व २९४ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी चालविली आहे.राज्यातील एकूण परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्रीय वित्तमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
नवी दिल्ली : बंगालमधील सर्व जागा लढविण्यास काँग्रेस सज्ज
तृणमूलसोबत युती करायची की नाही, याचा अंतीम निर्णय घेण्याचा अधिकार सोनिया गांधी यांच्याकडे देण्यात आला आहे. पश्चिम बंगालमधील काँग्रेसचा कार्यकार शकील अहमद यांच्याकडे आहे. आपल्यापरीने तिढा सोडविण्याचा प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केला, तथापि त्यांना जागावाटपावरुन मार्ग काढण्यात यश आलेले नाही. आम्ही ६४, ९० आणि २९४ जागांसाठीच्या तिन्ही प्रकारच्या याद्या तयार करीत आहोत, असे अहमद यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. बंगालमध्ये तृणमूलसोबत युती व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील असलो तरी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व जागांवर उमेदवार उभे केले जाऊ शकतात, असे अहमद यांनी स्पश्ष्ट केले. याबाबतचा अंतीम निर्णय सोनिया गांधी घेतील, असेही त्यांनी स्पष्ट कले.
