गोंदिया : राष्ट्रवादीची फ्लेक्स होर्डिंग बॅनरवर बंदी

गोंदिया १७ मार्च – राष्ट्रवादी काँग्रेसकडून फ्लेक्स होर्डिंग आणि बॅनर लावण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे.पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमाची प्रसिद्धी, नेत्यांच्या वाढदिवसाचे अभिनंदन करणाऱ्या जाहिरातीवरदेखील प्रतिबंध लागणार असून आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व अधिक असल्याने कुठल्याही कार्यक्रमाची जाहिरात करावयाची असल्यास शहरातच नव्हे तर तालुका स्तरावरसुद्धा मोठमोठी होर्डिंग तसेच बॅनर लावून प्रसिद्धी करण्यात येते. त्यातून पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची प्रसिद्धी होते. पण अलिकडेच मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांना पक्षाच्या अनधिकृत बॅनर आणि होर्डिंगसंदर्भात एका प्रकरणी निर्वाळा देताना खडसावले आहे. न्यायाधीश पी. बी. मजुमदार आणि न्यायाधीश ए. ए. सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लावण्यात आलेल्या अनधिकृत बॅनरसंदर्भात पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे पक्षाच्या प्रतिमेला तडा जात असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ यांनी राज्यातील सर्वच जिल्हाध्यक्ष तसेच इतर विविध सेलच्या पदाधिकार्यांाना लेखी पत्र पाठवून पक्षाकडून अनधिकृत बॅनर आणि होर्डिंग लावल्यावर बंदी घातली
आहे.

हे पत्र येथील जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. यासंदर्भात पुढील कारवाईकरिता पदाधिकार्यांतना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाचे बॅनर आणि होर्डिंग लावण्याकरिता प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांना न्यायालयाने जबाबदार धरले असल्याने याप्रकरणी राष्ट्रवादीकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांनी पत्रातून काही सूचनासुद्धा पदाधिकार्यां ना केलेल्या आहेत. त्याअंतर्गत आता पक्षाचे चिन्ह, नेत्यांचे फोटो लावून होर्डिंग आणि बॅनर तयार करू नये, असे निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच सूचनांचे पालन न करणार्यास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरुद्ध पक्ष शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आलेले आहे.

Leave a Comment