आय टी उद्योगातून देशाला ७१.७ अब्ज डॉलरचा महसूल मिळणार

मुबंई – भारताने माहिती-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात स्वतःचा खास ठप्पा उमटविला आहे.या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणार्याच युवकांसाठी येणारा काळही उत्साहवर्धक असेल.चालू वर्षी या क्षेत्रात २ लाख २५ हजारांहून अधिक रोजगार निर्माण होणार असून यामुळे देशाला ७१.७ अब्ज डॉलरच इतका महसूल मिळणार आहे.‘डिलाईट‘ या सल्लागार कंपनीने हा निष्कर्ष काढला आहे.

२०११ या वर्षातील तंत्रज्ञान, माध्यम आणि दूरसंफ क्षेत्रातील घडामोडी संबंधीचा आपला अंदाज अहवाल ‘डिलाईट‘ने नुकताच जाहिर केला. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रत्यक्ष कर्मचार्यां ची संख्या या वर्षी २२.३ लाखांवर पोहोचेल. या क्षेत्रातून ८० लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध होतील. माहिती-तंत्रज्ञान व बीपीओतून देशाला मिळणार्याक उत्पन्नाचा वाटा हा राष्ट्रीय उत्पन्नाच्या ५.८ टक्के इतका असेल. जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे इन्फोसिस व टीसीएम सारख्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावरील भरतीच्या घोषणा केल्या आहेत. पारंपारिक उत्तर अमेरिकेच्या तुलनेत यंदा युरोपीय आणि आशियातील बाजारपेठांतून अधिक महसूल मिळण्याची शक्यता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. लघु व मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी हे वर्ष महत्वाचे ठरेल असाही अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Comment