पृथ्वीचा चुंबकीय पट्टा झाला कमकुवत, फोन, सेटेलाईट्स, विमानांवर होणार परिणाम

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होत चालल्याची माहिती समोर आली असून, या मागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सेटेलाईटच्या डेटानुसार, आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिकेतील चुंबकीय क्षेत्राचा भाग कमकुवत होत चालला आहे. वैज्ञानिकांनुसार मागील काही वर्षात दक्षिण अटलांटिकचा भाग पसरत चालला आहे.

यूरोपियन अंतराळ संस्थेनुसार (ईएसए) चुंबकीय क्षेत्राची शक्ती ही 24 हजार नॅनोटेस्लासवरून कमी होऊन 22 हजार नॅनोटेस्ला झाली आहे. तसेच हा भाग पश्चिमेच्या दिशेने वर्षाला 20 किमी एवढा सरकत आहे. वैज्ञानिकांसाठी चिंतेची बाब म्हणजे कमी तीव्रतेचे दुसरे क्षेत्र दक्षिण आफ्रिकेकडे उदयास आले आहे, जे दक्षिण अटलांटिक एनोमली भागाला दोन भागात विभागू शकते.

पृथ्वीच्या गर्भात गरम लोहा असतो. हे पृथ्वीची ढाल म्हणून कार्य करत सुर्याच्या रेडिएशनपासून पृथ्वीवरील जीवांची रक्षा करते. जेवढे शक्तीशाली चुंबकीय क्षेत्र असेल, तेवढा अधिक रेडिएशनपासून बचाव होतो. हा गरम लोहाचा प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 3 हजार किमी खाली आहे. हा भाग फिरत असतो, ज्यामुळे इलेक्ट्रिक करंट तयार होतो. हेच नंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डमध्ये बदलते. चुंबकीय क्षेत्रामध्ये दर अडीच लाख वर्षांनी बदल होत असतो.

चुंबकीय क्षेत्रामध्ये होणाऱ्या बदलांचा परिणाम सेटेलाईट्सवर होऊ शकतो. सेटेलाईट्स काम करणे बंद झाल्यास जगभरातील टेलिकॉम नेटवर्क, मोबाईल फोन सारख्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये अडथळे येऊ शकतात. तसेच या भागातून जाणाऱ्या विमानांना देखील तांत्रिक अडथळा येऊ शकतो.

Leave a Comment