भारत हे अंमली पदार्थ विक्रीचे मोठे केंद्र

नवी दिल्ली दि ८ – अंमली पदार्थ तयार करणे व ते बाहेरच्या देशात पाठविण्याचे भारत हे मुख्य केंद्र बनले असल्याचे अमली पदार्थ नियंत्रण धोरण-राज्य विभाग-युनायटेड स्टेटच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालानुसार भारत सरकारने हे गुन्हे थांबविण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले असून भारतातून हे अमली पदार्थ युरेाप, आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया व उत्तर अमेरिकेत पाठविले जात आहेत. दक्षिणपश्चिम आशियाच्या मध्ये व दक्षिणपूर्व आशियात भारताचे भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.(सुवर्णकोर व सुवर्णत्रिकेाण). अवैध इंटरनेट औषधी कंपन्यांच्या माध्यमातून या पदार्थांची विक्री जशी केली जात आहे तसेच कुरीयर सेवेचा उपयोग करूनही हे अमली पदार्थ परदेशात पाठविले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

भारत हा जगातील अफूचे मान्यताप्राप्त उत्पादन करणारा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. अफूपासून बनविलेली उत्पादने औषधनिर्मितीसाठी वापरली जातात व भारतातील हा व्यवसाय वैध आणि  मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारा आहे. मात्र या व्यवसायातून अवैधरित्या अमली पदार्थ करण्यासाठी अफूपासून मिळालेल्या उत्पादनांचा मोठा हिस्सा वळविला जात असून त्यावर पोलिसांचे कोणतेही नियंत्रण नाही.

या अहवालानुसार जगभरातच कोकेन व हेरॉईनचा वापर कमी झाला असून त्याऐवजी अल्कोहोल,अफू आणि कॅनाबीज या भारतातील पारंपारिक पदार्थांपासून अॅफेटामाईन सारखे गुंगी आणणारे सिथेटिक म्हणजे कृत्रिम पदार्थ मोठ्या प्रमाणावर तयार केले जातात.हे पदार्थ वापरून बनविलेली औषधे कौंटरवरही सहजरित्या विकली जाऊ शकतात तसेच इंटरनेट व कुरिअरच्या माध्यमातूनही दिली जाऊ शकतात. भारताच्या आर्थिक विकासाला हातभार लावणारी जी तरूण पिढी आज उदयास येत आहेत त्यात ३५ वयोगटाखालील सुमारे ७० टक्के तरूण या रसायनांचा वापर करत आहेत. कामासाठी अधिक काळ जागे राहणे अथवा रिलॅक्स होण्यासाठी ही औषधरूपातील मादक द्रव्ये ते सेवन करत आहेत असेही निरीक्षण त्यांत नोंदविण्यात आले आहे.

भारत मेंद्रेक्स या गुंगी आणणार्याे गोळ्यांचाही मोठा उत्पादक असून या गोळ्या दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेत पाठविल्या जातात. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार औषधासाठी वापरण्यात येणार्या  अफूपासून बनविल्या गेलेल्या द्रव्याचा सुमारे दहा टक्के हिस्सा हेरॉईनकडे वळविला जातो आणि त्याचा वापर स्थानिक पातळीवरच केला जातो.त्यातूनच ब्राऊन शुगरचेही उत्पादन केले जाते मात्र हा व्यवसाय अवैधरित्या केला जातेा व पोलिसांचे त्यावर नियंत्रण येऊ शकत नाही.