नवी दिल्ली दि ८ – केंद्रीय मंत्रीमंडळातून डीएमकेने आपल्या मंत्र्यांना काढून घेऊ नये यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी द्रमुकचे प्रमुख एम करूणानिधी यांच्याशी फोनवरून बोलणी केली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या मध्यातच असा कोणताही निर्णय घेऊ नये अशी विनंती करूणानिधी यांना केली असल्याचे समजते. काल रात्री पार्लमेंटरी पक्षनेते टी.आर.बालू यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुखर्जी यांनी करूणानिधी यांच्याशी फोनवरून संफ साधला असून सायंकाळी ते पुन्हा करूणानिधी याच्याशी बोलणार असल्याचे समजते.
द्रमुक मंत्र्यांचे राजीनामे लांबले
प्रणव मुखर्जी यांनी दयानिधी मारन यांच्याबरोबर त्यापूर्वीच बैठक घेतली असून त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांचीही भेट घेतली आहे.
डीएमके मधील वरीष्ठ नेत्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री करूणानिधी यांनी विधानसभा निवडणूकीत युती करताना काँग्रेसने ६० पेक्षा अधिक जागा मागूच नयेत असे निक्षून सांगितले असून मतदारसंघाबाबतही आग्रही न राहण्याचे काँग्रेसला बजावले आहे.
दरम्यान आज सकाळीच चेन्नईहून डीएमकेचे सहा केंद्रीय मंत्री आपापल्या पदांचे राजीनामे घेऊन आले आणि सकाळी ११ वाजता त्यांनी पंतप्रधानांकडे राजीनामे सूपूर्द केल्याचे वृत्त आहे. त्यानंतरच अर्थमंत्री करूणानिधी यांच्याशी बोलले आहेत. या सहा मंत्र्यात एम के अलगिरी, डी नापोलियन व दयानिधी मारन यांचाही समावेश आहे.
