सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान : देशातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे

पुणे दि. १४ – देशातील नागरिकांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असून त्या दृष्टीने आगामी पाच वर्षात बालमृत्यूचा दर हजारी ४५ वर आणला जायला हवा असे २००९-२०१० च्या आर्थिक सर्वेक्षणाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. बालमृत्यूचा दर रोगामुळे वा अन्य अनैसर्गिक कारणांनी मृत्युमुखी पडलेल्या बालकांची एकूण संख्या एक हजारात किती या प्रमाणे ठरविण्यात येतो. सामाजिक व्यवस्थेच्या तसेच आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने ही माहिती समजणे आवश्यक ठरते. गेली कित्येक वर्षे हा दर हजारी ७० होता तेा आता केवळ  दोन ने कमी हंोऊन हजारी ६८ वर आला आहे. लोकसंख्या स्थिरतेसाठी बालसुरक्षा हा महत्वाचा भाग असतो. कारण बालकांचे मृत्यु कमी संख्येने होत असतील तर कुटुंबात मुलांचे प्रमाण ही कमी असते व कुटुंब नियंत्रणात राहते पण हे प्रमाण अधिक असेल तर एखादे तरी मूल रहावे या आशेने अनेक मुलंाना जन्म दिला जातो.

केंद्रीय कुटुंब कल्याण सचिव जे व्हीआर प्रसाद राव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सध्या बालमृत्युदर हजारी ६८ आहे पण तो ही अधिकच आहे . त्यामागे अपुरी रोगप्रतिकारक शक्ती हे कारण आहे. यावर उपाय म्हणूनच लसीकरणाचे कार्यक्रम नव्याने आखण्यात आले आहेत तसेच नवजात बालकांच्या मृत्युचे प्रमाण कमी व्हावे यासाठीही अनेक उपाययोजना तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच आगामी चार वर्षात बालमृत्युदर हजारी ४५ वर येईल अशी आशा वाटते.

या आर्थिक सर्वेक्षणात दहाव्या पंचवार्षिक योजनेन आरोग्य आणि कुटुंबकल्याणासाठी राबविण्यात येणार्याय योजनांमध्ये प्रसूतीदरम्यान होणारे महिलांचे मृत्युचे प्रमाणही कमी करणे याला अधिक महत्व देण्यंात आले आहे. प्रसूतीदरम्यान येणार्याच आकस्मिक अडचणींमुळे मृत्युमुखी पडणार्याद स्त्रियांचे प्रमाण सध्या हजारी चार असे असून हे प्रमाण फारच अधिक आहे. गेली अनेक वर्षे यात अजिबात बदल झालेला नाही.  आगामी पाच वर्षात हा दर दोन वर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वेक्षणात नोंदविण्यात आलेल्या बाबींमध्ये आरोग्यासाठी एकूण खर्चाच्या ५.२ टक्के एवढा खर्च केला जातेापण सार्वजनिक आरोग्यासाठी मंजूर केलेली रक्कम केवळ ०.९ टक्के एवढीच आहे. यात सुधारणा घडवायची असेल तर दारिद्रय रेषेखालील जनतेसाठी सार्वजनिक आरोग्य सुविधा वाढविणे गरजेचे आहे.

देशावर आरोग्याचा बाबतीत दोन पद्धतीने अधिक ताण येतो. बदललेल्या जीवनशैलीमुळे येणारे रोग व साथीचे व संसर्गजन्य रोग. किटकनाशकांना दाद न देणारे, प्रतिजैविकांना दाद न देणारे व एच आय व्ही सारखे नव्याने उदभवलेले संसर्गजन्य रोग आटोक्यात आणणे दिवसे नदिवस अवघड बनत चालले आहे. या बाबत अधिक खुलासा करताना यंदा सर्वेक्षणाच्या अहवालात असे नमूद करर्यालत आले आहे की मलेरिया हा रोग घेतला तर २००१ सालात मलेरियाच्या दोन दशलक्ष केसेस नोंदविल्या गेल्या, गेल्या वर्षीही हीच संख्या कायम होती.२०१० सालापर्यंत मलेरियावर नियंत्रण मिळवून हे प्रमाण किमान ५० टक्के तरी कमी करण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. तसेच एडस हा केवळ गंभीर रोगच नसून त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होतेा आहे. तसेच याचे वाढते प्रमाण हे देशाच्या विकासाला खीळ घालण्यासही कारणीभूत होत आहे. त्या दृष्टीने २००१ च्या मध्यापर्यंत एच आय व्ही ग्रस्तांचे ३.९७ दशलक्ष एवढी संख्या आहे २००७ पर्यंत ही वाढ रोखून ती शून्यावर आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Leave a Comment