जेलमध्ये जाण्यासाठी या व्यक्तीने दाखल केली याचिका

कोरोना लॉकडाऊनमुळे हजारो कामगार गुजरातच्या सीमेवर अडकले आहेत. या कामगारांना राजस्थानला जायचे आहे. मात्र जामिनावर बाहेर आलेल्या प्रकाश विश्नोई या दारू तस्कराने वेगळेच पाऊल उचलले आहे. त्याने गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, जेणेकरून त्याला बॉर्डर क्रॉस करण्याची परवानगी मिळेल व तो जेलमध्ये जाऊ शकेल.

प्रकाशला उच्च न्यायालयाने जी मुदत दिली होती, त्या वेळेत तो स्वतःला सरेंडर करू शकला नाही. कारण गुजरात पोलिसांनी लॉकडाऊनमुळे त्याला जेलमध्ये जाण्यासाठी फ्री कार्ड दिले नाही. त्याने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, सरेंडर करण्यास उशीर झाल्यावर त्याच्या जामिनावर परिणाम होईल.

विश्नोई पालनपूर जेलमध्ये होता. मागील वर्षी त्याला गुजरातवरून दारूचा ट्रक राजस्थानला घेऊन जाताना दोन अन्य व्यक्तींसोबत अटक करण्यात आले होते. ट्रकमधील 48 लाखांची दारू जप्त करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला तात्पुरता जामीन मंजूर करत 7 मे ला सरेंडर करण्यास सांगितले होते.

मागील आठवड्यात त्याने न्यायालयात याचिका दाखल केली की त्याला सरेंडर करायचे आहे. त्याने गुजरात पोलिसांना विनंती देखील केली, मात्र त्यांनी बॉर्डर क्रॉस करण्याची परवानगी दिली नाही. न्यायाधीश व्हीपी पटेल यांनी त्याला सरेंडर करण्याची परवानगी दिली असून, जेल प्रशासनाला त्याला ताब्यात घेण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 मे ला होणार आहे.

Leave a Comment