प्लास्टिकसाठी आदिवासींचा हा खास पर्याय, नेटकऱ्यांनी केले कौतूक

जगभरात प्लास्टिकची मोठी समस्या आहे. प्लास्टिकचा वापर करू नये यासाठी जागृकता देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. प्लास्टिकसाठी पर्याय म्हणून अनेक नवनवीन गोष्टींचा विचार केला जात आहे. भारतातील आदिवासी समुदाय प्लास्टिकला पर्याय म्हणून इको-फ्रेंडली गोष्टींचा वापर करत आहे. हे आदिवासी पानांपासून बनवलेल्या पत्रावळ्यांचा वापर करतात. एवढेच नाहीतर भाजीपाला आणि फळे विकण्यासाठी देखील याचा वापर करतात. या वस्तू मोठ्या पानांपासून बनवल्या जातात.

ट्विटर युजर रिशी बाग्रीने हे फोटो शेअर करत लिहिले की, प्लास्टिक-मुक्त भारत बनवायचा असेल, तर आपल्याला आदिवासींकडून शिकण्याची गरज आहे व यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

अभिनेता सुनील शेट्टीसह अनेक युजरनी देखील अशा पारंपारिक पद्धतीचा वापर करण्यात यावा असे म्हटले. अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.

Leave a Comment