भटकी कुत्री उपाशी राहू नये म्हणून हा युवक दररोज करतो 20 किमी प्रवास

लॉकडाऊनच्या काळात भटक्या प्राणींचे हाल होऊ नये म्हणून अनेक संस्था, प्राणीमित्रांकडून त्यांच्यासाठी अन्नाची सोय केली जाते. केरळच्या चांगनापूरी गावातील एक युवक भटकी कुत्री उपाशी राहू नये, रोज 20 किमीचा प्रवास करत त्यांना जेवायाला देतो.

24 वर्षीय अर्जून गोपी गरजूंची मदत करतो. यासाठी तो एका स्थानिक कम्यूनिटी किचनशी जोडलेला आहे. त्यांचे काम लॉकडाऊनमुळे जेवण न मिळणाऱ्या लोकांपर्यंत अन्न पोहचवण्याचे आहे. बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकणारा हा विद्यार्थी भटक्या कुत्र्यांचे पोट भरण्यासाठी दररोज 20 किमीचा प्रवास करतो. घरातून निघताना त्याची बॅग बिस्किटच्या पाकिटांनी भरलेली असते.

अर्जुन म्हणाला की, मी कधी एवढा प्राणी प्रेमी नव्हतो. मात्र जेव्हा मी कम्यूनिटी किचनशी जोडले गेलो, त्यावेळी पाकिट्स वाटताना आजुबाजूला अनेक अशक्त कुत्रे फिरताना दिसले. एक लहान पिल्लू देखील मला रोज दिसायचे. तेव्हापासून मी या प्राण्यांना जेवण देण्याचा निर्णय घेतला.

अर्जुनने हे काम 13 एप्रिलपासून सुरू केले आहे. सुरूवातीला तो केवळ आजुबाजूंच्या कुत्र्यांना जेवण देत असे. मात्र नंतर त्याने लांब जाण्याचा निर्णय घेतला. अनेकदा त्याने 140 पाकिट बिस्किट देखील कुत्र्यांना खायला घातली आहेत. अर्जुनने काही बचत केली होती. आता काही लोक त्याच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

Leave a Comment