चीनने केले 184 देशांचे वाटोळे – ट्रम्प

चीनला सुरूवातीलाच कोरोनाला नष्ट करण्यात अपयश आल्याने 184 देशांना नरकात ढकलले असल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कोरोना व्हायरसवरून चीनवर निशाणा साधला आहे. याशिवाय अमेरिकेतील खासदारांनी चीनवरील उत्पादन आणि खनिजांवरील निर्भरता कमी करावी, असे देखील म्हटले आहे.

कोरोना व्हायरस जगभरात पसरविण्यासाठी ट्रम्प यांनी अनेकदा चीनवर आरोप केला असून, याच्या चौकशीची देखील मागणी केली आहे. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील चीनकडून घेणार असल्याचे त्यांनी सूचवले.

चीनने जर व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असतानच याबाबतची माहिती दिली असती तर हा व्हायरस जगभरात पसरण्यापासून रोखता आला असता, असे अमेरिका, ब्रिटन आणि जर्मनीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प म्हणाले की, चीनमध्येच हा व्हायरस रोखता आला असता. मात्र तसे झाले नाही व त्यामुळे आज जगातील 184 देश नरकात ढकलले गेले आहेत.

कोरोना व्हायरसमुळे आता ट्रम्प प्रशासनावर चीनवरील निर्भरता बंद करण्यासाठी, खासदारांकडून दबाव वाढत आहे.

Leave a Comment