… आणि चक्क नळावाटे वाहू लागली हजारो लीटर रेड वाईन

तुमच्या घरातील नळावाटे पाण्याच्या जागी चक्क रेड वाईन येऊ लागली तर ? असा तुम्ही कधी विचारच केला नसेल. मात्र असे घडले आहे.

इटलीच्या कॅस्टेलेव्हेट्रो येथे स्थानिक वाइनरीमध्ये बिघाड झाल्याने हजारो लीटर तयार रेड वाईन वॉटर पाईपमध्ये मध्ये मिसळली. कँटिना सेटेकानी वाइनेरीनुसार, पाईपलाईनमधील वॉशिंग सर्किटच्या खराब वॉलमुळे हा सर्व प्रकार घडला.

शहराच्या उपमहापौर जॉर्जिया मेझ्झाक्यू यांच्यानुसार, हा सर्व प्रकार 3 तास सुरू होता व 20 घरांवर याचा परिणाम झाला. तसेच स्थानिक प्रशासनाने सांगितले की यामुळे कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या निर्माण होणार नाही.

जॉर्जिया म्हणाल्या की, अशा स्थितीत आम्ही लोकांना थोडाफार आनंद देऊ शकलो. कदाचित एकेदिवशी त्यांना नक्कीच याची आठवण येईल व ते आम्हाला भेटायला येतील.

वाइनेरीचे कमर्शियल मॅनेजर फॅबरिझिओ अमोरोट्टी यांनी सांगितले की, काही लोकांना फोनकरून आम्हाला याबाबत माहिती देखील दिली व ते काय करत आहेत हे सांगितले. तर काहीजण यासाठी आनंदी होते. अनेकजणांना वाईन बाटल्यांमध्ये देखील भरून घेतली.

Leave a Comment