ईएमआय टाळण्यासाठी आलेल्या कॉल-मेसेजमुळे होऊ शकते फसवणूक

लॉकडाऊनच्या काळात देखील ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. हे गुन्हेगार ऑनलाईन फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधत आहेत. हे हॅकर्स कर्जाचा हप्ता टाळण्यासाठी कॉल अथवा मेसेज पाठवत, लोकांची फसवणूक करत आहेत. बँकांनी अशा कॉल अथवा मेसेजपासून आपल्या ग्राहकांना सावध राहण्यास सांगितले आहे.

हे सायबर गुन्हेगार बँकेचे प्रतिनिधी म्हणून फोन करत लोकांना फसवत आहेत. फोन करत कर्जाचा हप्ता तीन महिने माफ करण्यात येत आहे, असे सांगत आहेत. यानंतर ओटीपी सांगण्यास सांगतात. जर तुम्ही ओटीपी दिल्यास, हे गुन्हेगार तुमचे खाते रिकामे करू शकतात.

एसबीआयने आपल्या ग्राहकांना ट्विट करत याबाबत सुचित केले आहे. एसयबीआयने ट्विट केले की, सायबर ठगांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत शोधली आहे. यांच्यापासून वाचण्यासाठी एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे सावधान आणि जागृक रहा. कृपया लक्षात घ्या की, ईएमआय टाळण्यासाठी ओटीपीची गरज नसते. तुमचा ओटीपी कोणालाही शेअर करू नका. तुमच्या कर्जाचा हप्ता टाळण्यासाठी बँकेची वेबसाईट https://bank.sbi/stopemi ला भेट द्या.

एसबीआयने प्रमाणेच आयसीआयसीआय बँकेने देखील आपल्या ग्राहकांना ट्विटद्वारे सावध केले आहे.

Leave a Comment