पुढील 2 महिने मोफत पाहू शकणार हे टिव्ही चॅनेल्स

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 14 एप्रिलपर्यंत देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरातच असलेले नागरिक टिव्हीवरील कार्यक्रमांचा आनंद घेत आहेत. सरकारने दुरदर्शनवरील रामायण, महाभारत मालिका देखील पुन्हा सुरू केल्या आहेत. यातच आता इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशनने पुढील दोन महिने 4 चॅनेल्स मोफत केले आहेत.

या चॅनेल्समध्ये सोनी पल, स्टार उत्सव, झी अनमोल आणि कलर्स रिश्ते या चॅनेल्सचा समावेश आहे. आयबीएफने याची घोषणा करताना सांगितले की, देशात लॉकडाऊन आहे व सरकारने नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. अशात चार मोठ्या नेटवर्क ब्रॉडकास्टर्सने आपले चॅनेल्सवरी टॅरिफ हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे चॅनेल्स पुढील दोन महिने केबल आणि डीटीएचच्या ग्राहकांसाठी मोफत असतील.

या चॅनेल्ससाठी आतापर्यंत वेगवेगळी किंमत द्यावी लागत असे. आतापर्यंत स्टार उत्सव, कलर्स रिश्ते आणि सोनी पल हे चॅनेल्स 1 रुपयांना होते तर झी अनमोलसाठी 0.10 रुपये द्यावे लागत असे. तसेच या चॅनेल्सच्या बकेट्सची किंमत देखील अधिक आहे.

Leave a Comment