तुर्तास बंद करा ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ तपासणी; पोलीस महासंचालकांचे आदेश


मुंबई – कोरोना व्हायरसचा राज्यातील प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनाचा विळखा फोफावत असल्याचे लक्षात आल्यानंतर याबद्दल राज्य सरकारकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या परिसरात याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलीस विभागाकडून ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’सारखी तपासणी करताना वापरण्यात येणाऱ्या यंत्राचा वापर काही काळासाठी थांबवण्याच्या सूचना राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रिथ एनलायजर ही मशीन संबंधित व्यक्तीच्या तोंडाजवळ नेऊन त्याची तपासणी केली जात असल्यामुळे कोरोनाचे संक्रमण अशा प्रकारे होण्याची शक्यता आहे. तसेच तपासणी करणाऱ्या पोलिसांना देखील अशा माध्यमातुन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे अशा प्रकारे प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पुढील आदेश येईपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या वाहतुक पोलीस विभागात या मशीनचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment