देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरीपार


नवी दिल्ली : भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा शंभरीपार गेला असून शनिवारी रात्री महाराष्ट्रात 5 नवीन कोरोनाचे रुग्ण दाखल झाल्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर गेली आहे.

केंद्र सरकारने कोरोनाचे वाढता संसर्ग पाहता कोविड – 19ला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सार्क देशांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्सींग द्वारे जगात वाढलेल्या कोरोनाच्या उपाययोजनसंदर्भात चर्चा करतील.

देशात यापूर्वी कोरोनाग्रस्तांची संख्या 96 होती. रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील आणखी 5 जण या आजाराने ग्रस्त आहेत. यापैकी 3 महिला आणि २ पुरुष आहेत. या पाचपैकी चार जण दुबईला गेले होते, तर 21 वर्षांचा पाचवा रुग्ण थायलंडहून आला आहे. यासह, महाराष्ट्रात कोरोना पीडितांची संख्या 31 वर आली आहे.

कोरोनाचे संशयित तीन रुग्ण अहमदनगरमधील एका शासकीय रुग्णालयातून पळून गेले होते. हे रुग्ण निरीक्षणाखाली होते. पण रात्री उशिरापर्यंत यातील दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयात परत आले. तोपखाना पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिसर्‍या रुग्णाचा शोध सुरू आहे. यापूर्वी दोन महिला आणि एका पुरुषाला आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. या तिघांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

Leave a Comment