या देशात ओळखपत्र नाही ‘चेहरा’ दाखवा

आतापर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यासाठी फोटो आयडीची (ओळखपत्र) गरज असते. मात्र येणाऱ्या काळात याची गरज पडणार आहे. सिंगापूर जगातील पहिला असा देश आहे, जेथे कोणत्याही कामासाठी फोटो आयडी नाही तर चेहरा दाखवावा लागणार आहे.

सिंगापूर सरकार फेशियल रिकॉग्निशन तंत्रज्ञानावर काम करत आहे. यानंतर देशभरातील सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये फोटो कियोस्क सिस्टम लागू केली जाईल. जेथे केवळ चेहरा दाखवल्याने काम होईल. यात देशभरातील नागरिकांची ओळख आणि पत्त्या समावेश असेल.

सरकार यावर्षी जूनमध्ये कियोस्क लावण्यास सुरूवात करेल. वर्ष 2020 पर्यंत ही सेवा देसभरात सुरू होईल. या सुविधेसाठी नागरिकांना सिंगपास नावाचे अ‍ॅप वापरावे लागेल.

Leave a Comment