कोरोनापासून वाचण्यासाठी अब्जाधीश करत आहेत जेट आणि बंकरचे बुकिंग

कोरोना व्हायरसच्या महामारीचा प्रसार 100 पेक्षा अधिक देशांमध्ये झाला आहे. आतापर्यंत 3 हजारांपेक्षा अधिक लोकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि यूरोपियन देशातील काही अब्जाधीश तर या महामारीपासून वाचण्यासाठी प्रायव्हेट जेट, बंकर आणि अंडर ग्राउंड शेल्टर होम बुक करत आहेत. जेणेकरून संकट आल्यास स्वतःला वेगळे करता येईल. काहींनी तर यासाठी स्वतःचे स्पेशल जेट्स देखील तयार करण्यास सांगितले आहेत.

या अब्जाधीशांनी पर्सनल डॉक्टर आणि नर्स ठेवण्याची देखील तयारी केली आहे. जेणेकरून कुटुंबातील सदस्य संक्रमित झाल्यास त्याच्यावर उपचार करता येईल. यासाठी ते जगभरातील सर्वोत्तम डॉक्टरांशी संपर्क करत आहेत.

लंडन येथील प्रायव्हेट हार्ले स्ट्रीट क्लिनिकचे चीफ एग्झिक्यूटिव्ह आणि मेडिकल डायरेक्टर मार्क अली यांनी सांगितले की, अब्जाधीश आमच्याकडे खाजगी कोरोना व्हायरस चाचणी करण्याची मागणी करत आहेत. असे करणे मात्र आमच्यासाठी शक्य नाही. कारण डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड सोशल केअर सर्व चाचण्या एनएचएस आणि पब्लिक हेल्थ इंग्लंडद्वारे करणे अनिवार्य केले आहे.

अमेरिकेतील प्रायव्हेट जेट बुकिंग सर्व्हिस प्रायव्हेटप्लायचे चीफ एग्झिक्यूटिव्ह एडम ट्विडेल यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे प्रभावित देशांच्या अब्जाधीशांची सर्वाधिक मागणी येत आहे. ते आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी जेट बुक करू इच्छित आहेत. इटलीमध्ये लॉकडाउननंतर मागणी सर्वाधिक वाढली आहे.

त्यांनी सांगितले की, यूके आणि अन्य यूरोपियन देशांमधून बाहेर निघण्यासाठी ग्राहकांना अ‍ॅडव्हान्स बुकिंग हवे आहे. ते यासाठी काहीही किंमत देण्यास तयार आहेत.

अब्जाधीशांसाठी प्रायव्हेट जेटची व्यवस्था करणारी कंपनी क्विंटेशियलीने सांगितले की, जे लोक प्रायव्हेट जेटचा खर्च उचलू शकत नाही. ते प्रायव्हेट एअरपोर्ट लाउंजवर राहण्यासाठी करार करू इच्छित आहेत.

क्विंटेशियली यांनी सांगितले की, त्यांच्या एका सदस्याने आपल्या घराला मिलिट्री स्टाइल बंकरमध्ये बदलले आहे. संपुर्ण माहिती दिल्याशिवाय तेथे कोणीच जाऊ शकत नाही. या व्हायरसपासून वाचण्यासाठी लोक बंकर आणि अंडरग्राउंट शेल्टर खरेदी करण्यासाठी देखील तयार आहेत.

 

Leave a Comment