मेक्सिकोतील रहस्यमयी जागा, प्लेस ऑफ गॉड


फोटो सौजन्य कॅच न्यूज
जगात अनेक स्थळे अद्भूत या सदरात मोडणारी आहेत. अश्या स्थळांना पर्यटक मोठ्या संखेने भेट देतात. काही जागा या कायमच्या रहस्यमयी राहतात. म्हणजे संशोधक, वैज्ञानिक या जागेचे रहस्य उलगडू शकत नाहीत. अश्या जागा जगात खूप ठिकाणी आहेत आणि नवल म्हणूनच त्या आवर्जून पहिल्या जातात. अशीच एक जागा मेक्सिको मध्ये आहे. तिच्या मागचे गुढ आजतागायत उलगडू शकलेले नाही. या ठिकाणाला प्लेस ऑफ गॉड म्हटले जाते.

टीयाटीहुआवन असे या शहराचे नामकरण केले गेले आहे. आज भग्नावस्थेत असलेल्या या शहराचा शोध १४ व्या शतकात लागला, त्यावेळच्या एजटेक्स साम्राज्य होते त्याच लोकांनी या शहराचा शोध लावला आणि या शहराला नाव याच लोकांनी दिले. या लोकांचा असा समज होता की हे शहर कुणीच निर्माण केलेले नाही तर ते आपोआप अस्तित्वात आले. कारण बराच शोध घेऊनही हे शहर कुणी, कधी, कशासाठी आणि का वसविले असावे याचा काहीही तपास लागू शकला नव्हता आणि आजही हे गुढ कायम आहे.

कोणत्याही पुस्तकात अथवा ग्रंथात या शहराची माहिती मिळत नाही. या शहरातील एका प्रचंड पिरामिडच्या आत शेकडो सांगाडे सापडले त्यावरून येथे शेकडो लोकांना बळी दिले गेले असावे असा तर्क काढला गेला. या शहराचा परिसर प्रचंड मोठा आणि अतिशय नेटकेपणे आखलेला आहे. या ठिकाणी पर्यटकांची नेहमीच मोठी गर्दी असते.

Leave a Comment