
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या मध्यप्रदेशातील ऑपरेशन लोटसवर टीका केली आहे. महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी असून शंभर दिवसांपूर्वीच एक ऑपरेशन फसल्यामुळे महाराष्ट्राला मध्यप्रदेशच्या लोटस व्हायरसची लागण होणार नाही, अशी खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
महाराष्ट्राला होणार नाही लोटस व्हायरसची लागण : राऊत
महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वी फसले आहे.त्यानंतर महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवला.मधयप्रदेशचा वायरस महाराष्ट्रत घुसणार नाही. चिंता नसावी.
जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) March 11, 2020
ही खोचक प्रतिक्रिया संजय राऊत यांनी ट्विट करत व्यक्त केली. महाराष्ट्राची ‘पॉवर’ वेगळी आहे. शंभर दिवसापूर्वी एक ऑपरेशन फसल्यानंतर बायपास ऑपरेशन करून महाविकास आघाडीने महाराष्ट्र वाचवला. मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही. चिंता नसावी, असा टोला संजय राऊत यांनी हाणला आहे.
भाजपच्या ऑपरेशन लोटसवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही जोरदार टीका केली आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून लोटस व्हायरस पाहत आहोत. आम्ही अनेकवेळा या व्हायरसशी सामना केला. हा व्हायरस आम्ही कशापद्धतीने घालवला हे सर्वांना माहीत आहे. आम्ही हा व्हायरस महाराष्ट्रातून शंभर दिवसांपूर्वीच घालवला असल्याची बोचरी टीका सामंत यांनी केली.
