सीएनजी किटबाबत जाणून घ्या संपुर्ण माहिती

देशभरात सीएनजी कारची लोकप्रियता अधिक आहे. तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहक सीएनजी गाड्यांना प्राथमिकता देतात. काही लोक पैसे वाचवण्यासाठी कंपनीची फिटेड सीएनजी गाडी घेण्याऐवजी नंतर सीएनजी लावतात. या दोन्हींपैकी कोणते सीएनजी चांगले याविषयी जाणून घेऊया.

Image Credited – Amarujala

सीएनजी किटचे प्रकार –

सीएनजी किट वेंच्युरी सीएनजी किट आणि सिक्वेंशियल सीएनजी किट अशा दोन प्रकारची असतात.

वेंच्युरी सीएनजी किट –

हे सीएनजी किटचे सुरूवाती व्हर्जन असून, हे बाय-फ्यूल सिस्टमवर काम करते. यामध्ये सेंसर आणि इंजिन कंट्रोल यूनिट नसते. हे किट एका मर्यादेत गॅसला इंजिनमध्ये पाठवते. ही मात्रा थ्रॉटलवर अवलंबून असते.

सिक्वेंशियल सीएनजी किट –

हे आधुनिक सीएनजी किट असून, सध्याच्या गाड्यांमध्ये याचाच वापर होतो. या किटमध्ये लेटेस्ट सेंसर आणि ईसीयू लावलेले आहेत. यात गॅस इंजेक्टर्सला फ्यूल इंजेक्टर्सशी जोडलेले असते. सोबतच ईसीयू गॅसच्या मात्रेला नियंत्रित करते.

Image Credited – Amarujala

दोन्ही सीएनजी किटमधील फरक –

दोन्ही किटमध्ये सेंसर आणि ईसीयूचा फरक आहे. ईसीयूद्वारे इंजिनला गरजेनुसार गॅस पोहचतो, जे सिक्वेंशिल किटचे वैशिष्ट्य आहे. सिक्वेंशल सीएनजी किट सुरक्षित आहे, कारण यात एक वेगळे कॉम्प्युटर असते.

इंजिनसाठी सीएनजी धोकादायक ?

अनेकांना वाटते की सीएनटी किटचा दीर्घकाळ वापर केल्याने इंजिनसाठी धोकादायक आहे. मात्र असे काहीही नाही. सीएनजी चाचणी केलेले आहे व खूपच स्वस्त देखील आहे. अनेक कार आज सीएनजीवर चालतात.

Image Credited – Amarujala

कंपनी फिटेड सीएनजी की आफ्टरमार्केट सीएनजी ?

अनेकदा नवीन कार खरेदी करताना ग्राहक बाहेरून सीएनजी किट बसवून घेऊ, असा विचार करतात. मात्र बाहेरून सीएनजी किट बसवून घेण्याचा एक फायदा आहे, तो म्हणजे कमी किंमत. मात्र मारुती कंपनीचा दावा आहे की, त्यांच्या फॅक्ट्री फिटेड सीएनजी अधिक मायलेज देतात. सोबतच सुरक्षित व स्वस्त देखील आहेत. बाहेरून बसवून घेण्यात येणारे किट अप्रशिक्षित मॅकेनिक लावतात, जे धोकादायक आहे.

किंमतबद्दल सांगायचे तर पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत कंपनी फिटेड किट 60 ते 70 हजार रुपयांनी महाग असते. तर आफ्टर मार्केट किटची किंमत 40 ते 50 हजार रुपये आहे. बाहेरून किट लावल्याने गाडीची वॉरंटी देखील समाप्त होते. तुम्ही जुन्या गाडीला आफ्टर मार्केट किट लावू शकता. कारण तोपर्यंत कंपनी वॉरंटी समाप्त झालेली असेल.

Image Credited – Amarujala

सीएनजी किट सुरक्षित ?

सीएनजी किट सुरक्षेबाबत लोकांचे अनेक प्रश्न असतात. मात्र सीएनजी किट एकदम सुरक्षित असते.

मायलेज –

पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी गाडीची मायलेज अधिक असते. एक किलो सीएनजी गॅस एक लीटर पेट्रोलच्या तुलनेत 40 टक्के अधिक मायलेज देते. तसेच पेट्रोलच्या तुलनेत गॅसची किंमत कमी देकील आहे.

का खरेदी करावी सीएनजी कार ?

जर तुम्ही दररोज 70 ते 80 किमी प्रवास कारने करत असाल तर सीएनजी कारचा पर्याय निवडू शकता. पेट्रोलवर अधिक खर्च होत असेल, तरी तुम्ही सीएनजी निवडू शकता. सीएनजी पर्यावरणासाठी देखील धोकादायक नाही.

Leave a Comment