
बॉलीवूड बागी, टायगर श्रॉफ याने त्याचा ३० वा वाढदिवस २ मार्च ला साजरा केला. लहान वयात त्याने मोठे यश मिळविले आहे आणि त्याला लग्झरी लाईफ जगण्याची आवड आहे. मुंबईत टायगरचे दोन बंगले असून त्यातील एक २२.५ कोटीचा आहे तर दुसरा ५६ कोटींचा आहे. त्याच्या ताफ्यात मर्सिडीज बेंझ ई २२० डी, एसएस जग्वार १०, रेंज रोव्हर आणि एक व्हिंटेज कार असून त्यांची किंमत कोट्यवधीत आहे. फिल्म इंडस्ट्री मध्ये तो सर्वात फिट अभिनेता म्हणून ओळखला जातो.
असे आहे टायगर श्रॉफचे लग्झरी लाईफ
टायगर श्रॉफ मार्शल आर्ट ब्लॅक बेल्ट आहे आणि जिममध्ये त्याने त्याची बॉडी चांगलीच तयार केली आहे. पण त्याने एका मुलाखतीत सांगितले होत की हॉरर फिल्म पहिल्यापासून तो कधीही एकटा झोपत नाही. घरात त्याला आईची सोबत असते पण बाहेर गेलेला असेल तर टीम मधील लोकांसोबत तो झोपतो. बॉलीवूडपूर्वी तो स्पोर्ट्स मध्ये होता. त्याने तायक्वांदो ५ वी डिग्री मिळविली आहे. बॉलीवूडमध्ये त्याचे पदार्पण झाले २०१४ मध्ये हिरोपंती चित्रपटातून. टायगर प्रेक्षकांचा आवडता अॅक्शन हिरो आहे. त्याचे चित्रपट यशस्वी ठरले असून वॉर मुळे त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. २०० कोटींच्या बंगळूरू टायगर्स फाईट टीमचा तो मालक आहे.
