या वैज्ञानिकांच्या शरीराचे अवशेष आजही ठेवण्यात आलेत सुरक्षित

मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या शरीराला एकतर जाळण्यात येते अथवा दफन केले जाते. मात्र काही देशात मृतव्यक्तीच्या शरीरातील काही अंगाना सुरक्षित ठेवले जाते. अशाच काही वैज्ञानिकांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्या शरीराचे अवशेष शेकडो वर्षांपासून संरक्षित ठेवण्यात आले आहेत.

Image Credited – Amarujala

इटलीचे प्रसिद्ध वैज्ञानिक गॅलिलियो गॅलिली यांनी दुर्बिणचा शोध लावला होता. त्यांचे एक बोट, अंगठा आणि पाठीचे एक हाड इटलीच्या फ्लोरेंस येथील संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. रिपोर्टनुसार, या अंगाना 1737 मध्ये त्यांच्या शवाला एका थडग्यातून दुसऱ्या थडग्यात नेत असताना काढण्यात आले होते.

Image Credited – Amarujala

अल्बर्ट आइनस्टाइन यांना तर सगळेच ओळखतात. त्यांच्या मृत्यूनंतर वर्ष 1955 मध्ये त्यांचे डोळे काढून न्यूयॉर्कमध्ये संरक्षित करण्यात आले. याशिवाय त्यांचा मेंदू देखील काढण्यात आला होता व वैज्ञानिकांनी त्यावर वर्षांनुवर्ष संशोधन केले.

Image Credited – Amarujala

लाईट बल्ब, फोनोग्राफ आणि कॅमेऱ्याचा शोध लावणारे वैज्ञानिक थॉमस एडिसन यांच्या शरीराचे कोणतेही अंग नाही. मात्र त्यांचा शेवटाचा श्वास संरक्षित करण्यात आले आहे. त्यांचा अखेरचा श्वास एका चाचणी ट्यूबमध्ये अमेरिकेच्या मिशिगन शहरातील संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment