म्हणून आज साजरा करतात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’

दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी महान वैज्ञानिक सी व्बी रामन यांनी रामन इफेक्टचा अविष्कार केला होता. यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

सी व्ही रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 ला भौतिकी शास्त्रातील मोठा शोध लावला होता. पारदर्शी पदार्थातून प्रसार झाल्यानंतर प्रकाशाच्या किरणांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत त्यांनी महत्त्वपुर्ण शोध लावला होता. या शोधासाठी 1930 साली त्यांना भौतिक शास्त्रात नोबेल पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते भारतच नाही तर आशियातील पहिले वैज्ञानिक होते.

त्यांच्या या शोधाच्या सन्मानार्थ 1986 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जात आहे. 1954 मध्ये भारत सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न पुरस्कारने देखील सन्मानित केले. यावर्षीच्या विज्ञान दिनाची थीम ‘Women in Science’ अशी आहे.

या दिवसाचा मुळ उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यासाठी प्रेरित करणे, विज्ञानाप्रती आकर्षित करणे, त्याप्रती सजग बनवणे हा आहे.

सी. व्ही. रामन यांच्याविषयी –

सी व्ही रमन यांचा जन्म ब्रिटिश भारतात मद्रास संस्थानामध्ये 7 नोव्हेंबर 1888 ला झाला होता. त्यांचे वडील गणित व भौतिकशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बीए व एमए केले. त्यांचा मुख्य विषय भौतिकशास्त्र हाच होता.

त्यांनी भारत सरकारच्या वित्त विभागात नोकरीसाठी देखील परिक्षा दिली व त्यात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी 1907 मध्ये असिस्टंट अकाउंटट जनरलची नोकरी देखील केली. मात्र विज्ञानाप्रती असलेल्या आवडीमुळे त्यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टीवेशन ऑफ सायन्स आणि कोलकत्ता यूनिवर्सिटीच्या प्रयोगशाळेत प्रयोग करत होते.

Leave a Comment