अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले होते. या वेळी त्यांनी अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये जोरदार भाषण केले. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात अनेक महान भारतीयांचा उल्लेख केला. मात्र भारतीय नावांचा उच्चार ट्रम्प यांना व्यवस्थित करता आला नाही. भारतीय नावांच्या चुकीच्या उच्चारानंतर ट्रम्प यांना सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले. ट्रम्प यांनी स्वामी विवेकानंद यांच्या नावाचा देखील चुकीचा उच्चार केला.
विवेकानंदांचे ‘विवेक का मुंडन’, ट्रम्प यांची कॉमेडियनने घेतली शाळा
अमेरिकन कॉमेडियन ट्रेव्हर नोआने देखील आपला कॉमेडी शो ‘The Daily Show With Trevor Noah’ मध्ये ट्रम्प यांच्या हिंदी उच्चारांची खिल्ली उडवली.
सोशल मीडियावर ट्रेव्हर नोआचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ट्रम्प स्वामी विवेकानंद यांच्या नावाचा उच्चार ‘विवेक का मुंडन’ असा करत आहेत. यावेळी ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरील भाव देखील हस्यास्पद आहेत.
व्हिडीओमध्ये कॉमेडियन ट्रेव्हर नोआ म्हणत आहे की, त्यांचे उच्चार योग्य जरी असते, तरी त्यांचे हावभाव चुकीचे आहेत. ट्रम्प यांचे भाषण संपल्यानंतर ट्विटरवर लोक त्यांना ट्रोल करत आहेत. ट्रम्प हिंदीच नाही तर इंग्रजी शब्दांचा उच्चार देखील व्यवस्थित करत नाहीत.
