क्रुझवर अडकलेल्या नागरिकांना जपान सरकारने केले 2 हजार आयफोनचे वाटप


कोरोना व्हायरसमुळे संक्रामित झालेल्या आणि डायमंड प्रिसेंस क्रुझवर अडकेल्या नागरिकांना जपानच्या सरकारने 2 हजार आयफोनचे वाटप केले आहे. कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यानंतर हे क्रुझ जपानच्या किनाऱ्यावर थांबण्यात आले आहे. प्री-इन्स्टॉल लाइन अॅप वाटप करण्यात आलेल्या आयफोनमध्ये देण्यात आल्यामुळे मेसेजच्या माध्यमातून नागरिकांना डॉक्टरांशी संपर्क साधत कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सल्ला घेऊ शकतात.


जपान मधील चिकित्सक विशेतज्ञांसोबत नागरिक बातचीत करु शकतात. रिपोर्टच्या मते, क्रुझचे चालक आणि नागरिकांना प्रत्येक केबिनमध्ये कमीत कमी एक फोनची सोय करुन देण्यात आली आहे. जवळपास 3700 नागरिक डायमंड प्रिंसेस क्रुझवर अडकले आहेत. यामध्ये सहा भारतीय नागरिकांचा देखील समावेश आहे. क्रुझमध्ये क्रूचे 1100 सदस्य असून त्यापैकी 132 भारतीय आहेत. क्रूझमधील 350 लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 2 हजार आयफफोनचे जपानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालय यांच्यासह विविध मंत्रालयांना वाटप केले आहे. डायमंड प्रिन्सेसवरील आयफोनद्वारे प्रवाशांना जपान सरकारने वापरकर्त्याची पुस्तिकादेखील वितरित केली आहे. या मॅन्युअलचा उद्देश लोकांना वैद्यकीय मदत मिळविण्यासाठी लाइन अॅपचा कसा वापर करावा हे समजून घेण्यास मदत करणे हा आहे.

Leave a Comment