
नवी दिल्ली – भारताचा ‘यॉर्करकिंग’ जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय ‘टी-२०’ क्रिकेटमध्ये सर्वाधिक निर्धाव षटके टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. त्याने ही कामगिरी न्यूझीलंडविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात केली. हा विक्रम यापूर्वी श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या नावावर होता.
बुमराहची ‘टी-२०’ क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी
आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट कारकिर्दीतील २०५.१ षटकांपैकी ६ षटके कुलसेकराने निर्धाव टाकली होती. तर, १७९.१ षटकापैकी ७ षटके बुमराहने निर्धाव टाकली आहेत. त्याने न्यूझीलंडच्या डावाच्या दुसर्या षटकात एकही धाव दिली नाही. शिवाय, या षटकात त्याने मार्टिन गप्टिलला बादही केले होते. बुमराहने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने सामन्यात ४ षटकांत १२ धावा देऊन तीन बळी घेतले. या क्रमवारीत, भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग तिसर्या क्रमांकावर आहे. टी-२० मध्ये त्याने ५ षटके निर्धाव फेकली आहेत. २८ सामन्यात १०२ षटके गोलंदाजी करुन हरभजनने हा विक्रम केला होता.
