
मुंबई : महाराष्ट्रातील शहरांची स्वच्छ सर्वेक्षण अभियानात उल्लेखनीय कामगिरी दिसून आली आहे. टॉप १० स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये राज्यातील चार शहरांचा समावेश आहे. राज्यातील स्वच्छ शहर म्हणून नाशिकने पहिला क्रमांक तर देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. २०२० च्या पहिल्या टप्प्यात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड सहाव्या, नवी मुंबई आठव्या तर वसई-विरार १०व्या स्थानावर आहेत. सर्वाधिक स्वच्छ शहर म्हणून देशात इंदूरने पहिला क्रमांक पटकावला आहे.
महाराष्ट्रातील ४ शहरांचा स्वच्छ सर्वेक्षण अभियानात टॉप १० मध्ये समावेश
पुन्हा एकदा स्वच्छता सर्वेक्षणमध्ये मध्य प्रदेशमधील इंदूरने अव्वल क्रमांक मिळवला आहे. स्वच्छता सर्वेक्षणच्या यादीत पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत १० लाख लोकसंख्या असलेल्या इंदूरने पहिला क्रमांक मिळवला आहे. इंदूरला केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षणात देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हटले आहे.
झारखंडला २०१८ च्या सर्वेक्षणात सर्वश्रेष्ठ कामगिरीचा पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड होते. मागच्या सर्वेक्षणेच्या तुलनेत यंदा नागरिकांच्या प्रतिक्रियेला खास महत्त्व देण्यात आले होते. पण इंदूरने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. पहिला क्रमांक पटकवण्य़ासाठी महाराष्ट्रातील महापालिका आणि नगरपालिका तसेच प्रशासनाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे.
