हत्तीला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी वापरला ‘आर्किमिडीजचा सिद्धांत’

झारखंड येथे एका विहिरीत पडलेल्या हत्तीला वाचवण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कामगिरीचे सध्या सर्वत्र कौतूक होत आहे. अधिकाऱ्यांनी हत्तीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी चक्क आर्किमिडीजचा सिद्धांत वापरला.

हत्तीचे पिल्लू झारखंड येथील गुमला जिल्ह्यातील अमलिया टोली गावातील विहिरीत पडले. स्थानिक लोकांना याची माहिती मिळताच त्यांनी मदतीसाठी त्वरित वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवले.

तीन तास चालेल्या या ऑपरेशनमध्ये अधिकाऱ्यांनी आर्किमिडीजचा सिद्धांत वापरून छोट्या हत्तीला वाचवले. आर्किमिडीजचा सिद्धांतांनुसार एखाद्या वस्तूला तो द्रवात बुडालेला असताना केलेले वजन, हे त्याच्या वजनापेक्षा कमी भरते. हे कमी झालेले वजन त्या पदार्थाने बाजूला सारलेल्या द्रवाच्या वजनाइतके कमी होते.

त्यानंतर विहिरीत पाणी भरण्यात आले व हत्तीला बाहेर येण्यासाठी विहिरीचा कठडा तोडण्यात आला. जेणेकरून हत्तीचे पिल्लू सहज बाहेर येऊ शकेल.

सोशल मीडियावर युजर्सनी देखील वनविभागाच्या या कामगिरीचे कौतूक केले.

Leave a Comment