सीएए इंग्रजांच्या काळ्या कायद्याप्रमाणे – उर्मिला मातोंडकर

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सिनेजगतातून अनेक कलाकारांनी आवाज उठवल्यानंतर आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील या कायद्यावर टीका केली आहे. उर्मिला यांनी या कायद्याची तुलना इंग्रजांच्या रॉलेट कायद्याशी केली आहे.

प्रथम विश्वयुद्ध संपल्यानंतर 1919 मध्ये ब्रिटिशांनी रॉलेट कायदा आणला होता. याच कायद्याला इतिहासात काळ्या कायद्याची संज्ञा दिली जाते.

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्ताने नागरिकत्व संशोधन कायद्यावर टीका करत उर्मिला मातोंडकर म्हणाल्या की, 1919 मध्ये विश्वयुद्धानंतर इंग्रजांना समजले होते की भारतात त्यांच्याविरोधात असंतोष वाढत आहे. त्यामुळे त्यांनी रॉलेट कायदा भारतात लागू केला. 1919 चा रॉलेट कायदा आणि 2019 च्या नागरिकत्व संशोधन कायद्याला आता इतिहासात काळा कायदा म्हणून ओळखले जाईल.

उर्मिला यांच्या आधी देखील अनुराग कश्यप, तापसी पन्नू, अनुभव सिन्हा, स्वरा भास्कर, नसीरुद्दीन शाह, मीरा नायर, टीएम कृष्णा,  ऋचा चड्ढा, विशाल भारद्वाज, झोया अख्तर या सिनेकलाकारांनी या कायद्याला विरोध केला आहे.

Leave a Comment