लँड रोव्हरची 55 लाखांची शानदार एसयूव्ही भारतात दाखल

जॅग्वार लँड रोव्हरने भारतात आपली नवीन एसयूव्ही रेंज रोव्हर एव्होक (Range Rover Evoque) लाँच केली आहे. या स्टाइलिश एसयूव्हीची किंमत 54.94 लाख रुपये आहे. नवीन रेंज रोव्हर एव्होक पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायसह एस आणि एसई या दोन व्हेरिएंटमध्ये मिळेल.

या नवीन एसयूव्हीमध्ये बीएस6 मानक 2.0 लीटर पेट्रोल आणि डिझेल इंजिन मिळेल. पेट्रोल इंजिन 247 बीएचपी पॉवर आणि 365 एनएम टॉर्क जनरेट करते. तर डिझेल इंजिन 178 बीएचपी पॉवर आणि 430 एनएम टॉर्क निर्माण करतात. दोन्ही इंजिन 9 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशनने सुसज्ज आहेत.

Image Credited – Navbharattimes

लँड रोव्हरने जुन्या मॉडेलच्या तुलनेत नवीन एव्होकमध्ये अनेक बदल केले आहेत. या नवीन एव्होकचे स्टायलिंग मोठी एसयूव्ही वेलारपासून प्रेरित आहे. याच्या पुढील बाजूला नवीन डिझाईनच्या हेडलाइट्स, अपडेटेड फ्रंट ग्रिल आणि नवीन फ्रंट बंपर मिळेल. मागील बाजूला नवीन बंपर आणि टेललाइट्स मिळेल.

एव्होकमध्ये डीआरएलसोबत ऑटोमेटिक एलईडी हेडलाइट्स, हीटेड विंग मिरर्स, पॉवर्ड टेलगेट, पॅनोरमिक सनरुफ, 18 इंच एलॉय व्हिल्ज, 2-झोन ऑटोमेटिक क्लायमेट कंट्रोल, पूश बटन स्टार्ट, लेदर सीट्स आणि स्टेअरिंग, क्रूज कंट्रोलसारखे खास फीचर्स मिळतील.

Image Credited – gaadiwaadi

सोबतच या शानदार एसयूव्हीमध्ये अँड्राईड ऑटो आणि अपल कार प्ले, नेव्हिगेशन सपोर्ट असणारे 10 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळेल.

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये 6 एअरबॅग्स, ईबीडी सोबत एबीएस, मागे SOFIX चाइल्ड सीट माउंट्स, पडेस्ट्रियन एयरबॅग, इमर्जेंसी ब्रेक असिस्ट, हिल असेन्ट अँड डिसेंट कंट्रोल, स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, फ्रंट आणि रियर सेंसर्ससोबत रिअर कॅमेरा आणि रिअर लेन कीप असिस्ट सारखे स्टँडर्ट फीचर्स मिळतील.

Leave a Comment