गांधीजींसाठी हे जोडपे निघाले 1000 किमी पायी प्रवासाला

लोकांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे विचार कायम राहतात, असे म्हटले जाते. आज महात्मा गांधी यांच्या हत्येला अनेकवर्ष उलटून गेली आहेत. मात्र आजही त्यांचे विचार जगभरात पोहचले आहेत. तामिळनाडूच्या मदुरई येथील एक जोडपे गांधीजींचे विचार लोकापर्यंत पोहचवण्यासाठी 1000 किलोमीटर पायी प्रवासाला निघाले आहे.

49 वर्षीय एम करूप्पाया आणि व त्यांची 51 वर्षीय पत्नी के चित्रा यांनी रविवारपासून सेंदामपलायम येथून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. हातात तिरंगा आणि सायकालसोबत घेऊन ते 12 मार्चला 1000 किमी प्रवास करून हैदराबादला पोहचणार आहेत. 12 मार्च 1930 लाच गांधीजींनी दांडी यात्रेची सुरुवात केली होती.

डोनर्सनी या जोडप्याला सायकल देखील भेट दिली आहे. जेणेकरून ते त्याच्यावर आपले सामान ठेऊ शकतील. करुप्पाया सांगतात की, ते लोकांना गांधीजींच्या विचाराबद्दल सांगणार आहेत. खासकरून, एकता दहशत मुक्त जग, धार्मिक सद्भाव, महिला सशक्तीकरण, नद्यांचे पाणी वाचवणे सारख्या गोष्टींवर संदेश देणार आहेत.

या जोडप्याचे पुढील लक्ष्य 1 लाख किलोमीटर पायी प्रवास करण्याचे देखील आहे.

Leave a Comment